खायच्या गोळ्या बनवणारा हर्षे झाला ‘हर्षेज् चॉकलेट्स’चा (Hershey’s Chocolate) मालक

सध्या पुस्तकी शिक्षणाचं महत्त्व इतकं वाढलं आहे की शिक्षणाशिवाय आपण काहीच करू शकत नाही, हे आपल्याला ठामपणे वाटतं. परंतु एकोणिसाव्या शतकात पदरी फक्त चौथीपर्यंतचे शिक्षण आणि व्यवहारज्ञान असताना एका अवलियाने सुरु केलेला छोटा व्यवसाय आज जगभरात पसरला आहे. या छोटेखानी व्यवसायाचा आज ‘हर्षेज् चॉकलेट्स‘ (Hershey’s Chocolate) नावाचा एक ब्रँड झाला आहे.

Things You Should Know Before Eating Hershey's Chocolate - Delish.com

पण तुम्हाला माहित आहे का, या व्यवसायाआधी हर्षेजचा मालक एका वेगळ्याच व्यवसायात गुंतला होता! हा व्यवसाय होता खायच्या गोळ्या बनवण्याचा. अत्यंत चिवट असणारं कॅरॅमल ढवळून त्यापासून या गोळ्या बनवायला ‘मिल्टन हर्षे’ याने सुरुवात केली. कालांतराने या गोळ्यांमध्ये शुद्ध दूध मिसळले जाऊ लागले. यामुळे गोळ्याची चव आणि दर्जा एकदमच सुधारला. गोळ्या बनवायला जितकी मेहनत लागायची तितका माल काही खपायचं नाही. विशेष नफाही होत नव्हता.

एकदा योगायोगाने एका ब्रिटीश व्यापार्‍याशी हर्षेची गाठ पडली…

त्या व्यापाऱ्याला हर्षेच्या गोळ्या फार आवडल्या. त्याने हर्षेला तब्बल ५०० पौडांची एक ऑर्डर दिली. ५०० पौंड म्हणजे साधारण 227 किलो. पहिल्यांदा कुणीतरी हर्षेवर इतका विश्वास दाखवला होता. त्यानंतर हर्षेला बरंच यश मिळत गेलं.

यादरम्यान हर्षे शिकागोच्या जागतिक औद्योगिक मेळाव्यात गेला.. और आ गया कहानी में ट्विस्ट! तिथे ठेवलेलं चॉकलेट बनवण्याचं जर्मन यंत्र पाहून हर्षे भारावून गेला. व्यवसायात आलेल्या इतक्या अपयशानंतर कुठेतरी स्थिरस्थावर होत असताना तो क्षणात हातचं सगळं सोडून पळत्याच्या पाठी लागणार होता.

लगेचच त्याने ते यंत्र विकत घेतलं. त्याच्या खायच्या गोळ्या बनवण्याच्या कारखान्यात एका कोपऱ्यात ते ठेवून त्याने चॉकलेटवर प्रयोग करायला सुरुवात केली. चॉकलेट व्यवसायात हेन्री नेसले आधीपासूनच होते. तरीही त्यांच्या चॉकलेट बनवण्याच्या तंत्राला टक्कर देत हर्षेने आपलं काम सुरूच ठेवलं.

कारखाना विकून केली नवी सुरुवात…

Milton Hershey: Chocolate King, Confectioner, and Creator - Business  History - The American Business History Center

१९०० सालात १० डॉलर्स पगार उत्तम समजला जात असे. या काळात हर्षेने आपला गोळ्या बनवण्याचा कारखाना दहा लाख डॉलर्स किमतीला विकला. त्या पैशांमधून चॉकलेटच्या यंत्राचा आणि तंत्राचा अभ्यास हर्षेने सुरु केला. गोळ्या बनवण्याच्या व्यवसायामध्ये अनेक वर्ष असल्यामुळे हर्षे चांगलाच व्यवहारज्ञानी झाला होता.

व्यवसाय कसा करावा, याचे बरेच ज्ञान त्याला अवगत होते. त्याने पेनसिलव्हेनियामध्ये दूरवरच्या शेतांमध्ये चॉकलेटचा एक कारखाना सुरु केला. येथे दूध आणि कामगार दोन्ही मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्त दरात उपलब्ध होते. या कारखान्यात ११४ प्रकारची चॉकलेट्स बनू लागली. हर्षेचा जगप्रसिद्ध चॉकलेट बार, किसेस हे चॉकलेट याच काळात सुरू झाले.

हळूहळू हर्षेज् चॉकलेट्स हा एक ब्रँड बनला. आज जवळपास ९० देशांमध्ये हर्षेज् चॉकलेट्स (Hershey’s Chocolate) प्रसिद्ध आहेत. २००७ साली किसेस चॉकलेटचा शंभरावा वाढदिवस होता. यानिमित्त हर्षेजच्या पेनसिलव्हेनियामधील कारखान्यात तब्बल साडेतीस हजार पौंड वजनाचं महाकाय चॉकलेट बनवण्यात आलं.

असं बनवलं जातं किसेस चॉकलेट!

HERSHEY'S KISSES Chocolates | History and FAQs

या मोठ्या चॉकलेट सारखाच किसेस चॉकलेटचा आणखी एक प्रसिद्ध किस्सा आहे. बहुतेक जणांना वाटतं की किसेसची चॉकलेट्स तयार करण्यासाठी ही कंपनी ठरावीक आकाराचा चॉकलेट साचा वापरते आणि या साच्यात द्रवरूप चॉकलेट ओतून थंड करून ते रॅप केलं जातं. पण खरं तर किसेस चॉकलेट बनवण्याची पद्धत याहून अगदी निराळी आहे. एका विशिष्ट प्रकारच्या यंत्रामधून फिरत्या पट्टीवर चॉकलेट ओतलं जातं आणि लगेचच थंड करून रॅप केलं जातं. या पूर्ण प्रक्रियेत कोणत्याच प्रकारचे साचे वापरले जात नाहीत. आहे की नाही गंमत!

तर ही होती हर्षेज् चॉकलेट्सची गोष्ट. आजच्या घडीला हर्षेज् हा एक नामवंत व लोकप्रिय ब्रँड आहे. व्यवसाय सुरू केला आणि लगेच घवघवीत यश मिळालं, असं क्वचितच होत असेल. यशाचा कुठलाही ‘इन्स्टंट फॉर्म्युला’ नसतो.. यशस्वी व्हायला अंगी असावे लागतात ‘संयम, चिकाटी आणि मेहनत’ हे गुण!

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *