एकेक पायरी चढताना…

OkThen : Advertising & Marketing

आज OkThen ला ७ महिने पूर्ण झाले.. गेल्या महिन्यात ब्लॉगिंगला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे आजचा दिवस हा ब्लॉग लिहायला योग्य वाटतो. सगळं काही सोशल मीडियावर असताना ब्लॉग लिहायचा घाट का घातला, असं एखाद्याला वाटणं साहजिकच आहे. त्याचं असं झालं की OkThen सोशल मीडियावर यायला फार उशीर झाला. त्यामागची कहाणी सांगण्याचा हा खटाटोप.

फ्रीलान्सिंग करत असताना ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू करण्याचा विचार बरेच दिवस मनात येत होता. पण अनुभवाअभावी हिंमत होत नव्हती. ती हिंमत देण्याचे काम (को-फाउंडर) समीरने चोख बजावले.

पार्टनरशिप मध्ये काम करत असताना एकमेकांचे विचार आणि एकमेकांच्या कल्पना जुळतात का किंवा जुळवून घेणे जमते का हे खूप महत्त्वाचे ठरते. आमच्या बाबतीत सुरुवातीला यामुळे फारच खटके उडायचे (आजही उडतात!). प्रत्येकाची विचारधारा वेगळी, कल्पना वेगळ्या आणि कामाची पद्धतही वेगळी. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर हा आमच्यासाठी ट्रायल पिरेड ठरला.

१७ ऑक्टोबरच्या रात्री समीरला फ्रीलान्सिंग साठी एक प्रोजेक्ट मिळाला आणि त्या प्रोजेक्ट पासून कॉलाबोरेशनला म्हणजेच OkThenला सुरुवात झाली. काही कारणास्तव प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही, मात्र OkThen जोमाने पुढे जाऊ लागले. आपण एकत्र काम करायचं की नाही हे स्वतःशी पक्के झाल्याशिवाय इतरांना सांगायचे नाही असे ठरले.

कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना आम्ही भेटून काम करण्यास सुरुवात केली. OkThenच्या भविष्याचा आराखडा तयार झाला आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OkThen सोशल मीडियावर आले.

https://www.instagram.com/okthen.online/

https://www.facebook.com/okthen.online

बऱ्याच जणांना हे अनपेक्षित होतं. OkThen मुळे काही नवीन माणसं जोडली गेली, तर काही परकी झाली. पण या सगळ्याची पूर्वकल्पना असल्यामुळे यात न अडकायचं आम्ही ठरवलं होतं.

सुरुवातीला एजन्सी कशी चालवावी इथपासून ते पॅकेज कसे असावे इथपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला शिक्षकांकडून मिळाली. रुईया कॉलेजचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी सर, वैष्णवी मॅम, पौरस सर यांनी आमच्या लहान-सहान शंकांचे निरसन केले. OkThenचा ऑफिशीयल भाग नसतानाही अनेक मित्र-मैत्रिणींनी आम्हाला मोलाची मदत केली. त्यांचे मनापासून आभार.

या सर्वांच्या सहकार्यामुळे OkThenला आणखी एक पाऊल पुढे जाण्यास बळ मिळाले. ऑफिशियल इंटर्नशिप तर कलाटणी देणारी ठरली. त्यामुळे इंटर्नसोबत आम्हीही संवाद कौशल्य, टीम वर्क शिकू लागलो. नवनवीन आयडिया सतत सुचत होत्याच. पण टीमच्या सपोर्टमुळे त्या प्रत्यक्षात उतरवता आल्या.

ॲडव्हर्टायझिंग एजन्सी जॉबचा कोणताही अनुभव नसताना वेगवेगळ्या ब्रँड्सकडे अप्रोच करणं खूप कठीण होतं. सुरुवातीचा बराच काळ आमची वेबसाईट नव्हती की सोशल नेटवर्क नव्हतं. त्यामुळे नव्याच्या नऊ दिवसांसारखं आमचं कामही जास्त दिवस टिकणार नाही असं काहींनी निश्चितच केलं, तर एकीकडे अनेकांनी आमच्या कामावर विश्वास ठेवला. समीरची संशोधक आणि प्रयोगशील वृत्ती इथे खूप कामी आली. वेगवेगळ्या केसस्टडीजचा आम्ही अभ्यास केला. खूप चुका केल्या. दररोज त्या दुरुस्त करत गेलो. आजही चुका आणि शिका याच धर्तीवर आम्ही काम करतोय.

हाती आलेला जॉब सोडून जाहिरात क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मी स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू करेन असं घरच्यांना कधीच वाटलं नव्हतं. पण आज हीच गोष्ट ते इतरांना अभिमानाने सांगतात!

लहान व्यावसायिकांना त्यांच्या बजेटमध्ये जाहिराती करून देणे, त्यांचे सोशल मीडिया प्रस्थ वाढवणे हे आमचे ध्येय आहे. OkThen च्या सोशल मीडिया मार्फतही आम्ही याबाबत जनजागृती करत आहोत. विविध व्यवसायांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे प्रवासवर्णन करणारी जाहिरात मोहीम आम्ही सुरु केली आहे.

तसेच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काय करावे, काय करू नये हे देखील आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहोत. OkThen सोबत व्यावसायिकांची एक कम्युनिटी तयार करण्याचा आमचा प्रयास आहे.

कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाऊन यांमुळे कामाची गती थोडी कमी झाली असली तरी सातत्य मात्र कमी होणार नाही!

OkThen, आज एवढंच पुरे झालं. जाता जाता OkThen ला इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका. आमचं काम तुम्हाला कसं वाटलं याचा अभिप्राय देखील say@okthen.online या ईमेल आयडीवर नक्की पाठवा.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *