शेवटी बाजी कोणी मारली..?

Pepsi vs Cocacola | Okthen

क्रिकेट जगतामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा काळ म्हणजे दर चार वर्षांनी येणारा क्रिकेट वर्ल्ड कप. साल १९९६, त्या वेळेचा वर्ल्ड कप किंवा विश्वचषक हा अनेक कारणांमुळे चर्चचा विषय ठरला. त्या वर्षी लंकन संघ पहिल्यांदा विजेतेपदाचा मानकरी ठरला.

याच काळात भारताने आपली आंतरराष्ट्रीय धोरणे बदलली होती. परिणामी अनेक परदेशी उद्योगांना चालना आणि बाजारपेठ प्राप्त झाली होती. याचा फायदा प्रत्येक क्षेत्रात जसा घेतला जात होता तसाच तो शीतपेय किंवा कोल्ड डिंक्स या क्षेत्रामध्येही होणार होता. यातून १९९६चा वर्ल्ड कप हा भारत-पाकिस्तान-श्रीलंका अशा तीन राष्ट्रांमध्ये होणार असल्याने व्यवसायाला मोठा फायदा होणार होता हे निश्चीत होते.

तर या बाजारपेठेच्या विस्तारासाठी पेप्सी आणि कोका कोला या दोन महाकाय कंपन्यांमध्ये चुरस वाढत होती. तेव्हा टेलिव्हिजनची सुरुवात असल्याने जाहिरातक्षेत्राचे महत्त्व वाढत होते. याचा फायदा पेप्सी आणि कोका कोला दोघांनी करायचा ठरवले.

पार्श्वभूमीचा अंदाज घेताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. दोन्ही कंपन्या ह्यांनी भारतामध्ये नुकतीच सुरुवात केली होती. साल १९७८ च्या बंदीनंतर कोका कोला हे नव्या जोमाने व्यवसाय करत होते. सोबतच त्याचा थम्स अप हे पेय देखील प्रसिद्धीझोतात होते. पेप्सीचा व्यवसायदेखील चांगल्या मार्गाने चालला होता.

यात पुढे वरचढ ठरण्यासाठी कोका कोलाने १९९६ सालचा वर्ल्ड कपची प्रायोजकत्त्व (Sponsorship) मिळवून आपली जाहिरात मोहिम राबवण्यास सुरुवात केली. एकूणचं कोका कोलाचे परडे भारी होते.

पेप्सीने मात्र थोडी युक्ती वापरली. कोकाकोला हे अधिकृत प्रायोजक (Official Sponsor) होते. ह्या एका घटकाला पकडून पेप्सीने ”Nothing official About It” अशी जाहिरात केली. जाहिरातीमध्ये किक्रेट विश्वातले अनेक मानकरी हे Official Sponsor च्या Official Drink ला नाकारून पेस्पीची वाट धरतात अशी जाहिरात दाखवली गेली.

परिणामी पेप्सीची जाहिरात अव्वल ठरली आणि कोटी रुपये खर्च करुन मिळवलेले कोकाकोलाचे प्रायोजकत्व हे त्यांच्या कामी आले नाही. शेवटी पेप्सीने बाजी मारली असे म्हटले जाते.

पेप्सीची Nothing Official About It ही जाहिरात पुढे दिलेली आहे.

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *